Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे

img 

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
_____ राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.
पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक,
_____ आहेत आमचे फार नाजूक.
भल्या पहाटे करावी देवाची पूजा,
_____ रावांच्या जीवावर करते मी मजा. 
बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
_____ रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड. 
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,
_____ भाव देत नाही किती केले ट्राय.
खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,
ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.
मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून,
_____ रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून. 

 

साखरेचे पोते सुईने उसवले,
_____ ने मला पावडर लावून फसविले. 
आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,
_____ रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा. 
साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा,
_____ राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा. 
हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,
मी आहे लंबू आणि _____ किती टिंगू. 
केळीचं पान टरटर फाटतं,
_____ ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.
त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.  
ही पण आहे सुंदर ती पण आहे छान.
कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान. 
लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते,
तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.
कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,
याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.  
Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,
याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka. 
घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,
आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.
Shinchan चा कुत्रा आहे shiro,
याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.