Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,_____ चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब_____ चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,_____ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,_____ चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
बारीक मणी घरभर पसरले,_____ साठी माहेर विसरले.
पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,_____ रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
लग्नात लागतात हार आणि तुरे,_____ च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,_____ रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,_____ रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
परसात अंगण, अंगणात तुळस,_____ नाव घ्यायचा मला नाही आळस.
रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,_____ च्या साथीने आदर्श संसार करीन.
इंग्रजीत म्हणतात मून,_____ चं नाव घेते _____ ची सून.
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात._____ रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,_____ चं नाव घेते कुंकू लावून.
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा._____ रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
चांदीचे जोडवे पतीची खूण,_____ रावांचे नाव घेते _____ ची सून.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,_____ चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।_____रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान_____रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर,_____रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!
- Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
- Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
- Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे
- Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे
- Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे
- Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
- Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
- Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
- Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे
- Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
0 Comments
Thanks For Watching