हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी,
______ आपण संसाराची सुरवात, करूया सर्वांच्या आशीर्वादांनी.
चंद्रभागेच्या तिरी बसलाय, माझा विठोबा सावळा,
______ च नाव घेतो मी, छत्रपती शिवरायांचा मर्द मराठा मावळा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी, तयार केले मजबूत राष्ट्र,
_____आणि______ कडून, सर्वांना जय महाराष्ट्र.
जाती-भेद नाही केला, कधी आमच्या शिवरायाने,
_____च नाव घेऊन पाऊल टाकते घरात, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने.
शिवनेरी किल्यावर झाला, शिवाजी महाराजांचा जन्म,
__________ रावांसारखे पती मिळावे, ७ जन्म.
छत्रपती शिवाजी महाराज आहेत, स्वराज्याचा हिरा,
_______ रावांचे नाव घेऊन , उखाणा करते पुरा.
मराठा आमची जात, भगवे आमचे रक्त,
_______ च नाव घेतो, मी शिवरायांचा भक्त.
भगवा झेंडा आहे, आमची शान,
_______च नाव घेतो, ठेवून सर्वांचा मान.
शिवाजी महाराजांनी केली, औरंगजेबाची मात,
________ रावांचे नाव घेऊन, पाऊल टाकते आत.
शिवाजी महाराज आहेत, अखंड भारताची शान,
________ रावांचे नाव घेते, ताठ ठेवून मान.
दरी-दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा,
____आणि____ च्या लग्नात आहे _____ चा बँडबाजा.
शिवाजी महाराजांच्या राज्यात, सुखी होती प्रजा,
_______रावांच्या जीवावर, करेन मी मजा.
धन्य ती जिजाऊ आणि शहाजी राजे, ज्यांनी जन्म दिला शिवबाला,
_____आले आयुष्यात म्हणून, महत्व भेटले जीवनाला.
ताठ होतील माना, उंच होतील नजरा,
_____आणि _____कडून शिवरायांना मानाचा मुजरा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला, पुस्तके पडतील कमी,
________ला आयुष्यभर खुश ठेवण्याची, देतो मी हमी.
जाती-भेद कधी नव्हता, रयतेच्या राज्यात,
_______ला पत्नी बनवून आणली, आमच्या समाजात.
कपाळी लावतो आम्ही, भगवा गंध,
_____आणि ______ला आहे शिवबांचा छंद.
छत्रपती शिवाजी महाराज, आमचे आदर्श आहेत,
_______ राव माझे सौभाग्य आहेत.
प्रत्येक मावळ्यांनी दिली, शिवबांना साथ,
______आणि______ ला सर्वांच्या आशीर्वादाने घ्या घरात.
शिवरायांचे मावळे आम्ही, नाही कुणाची भीती,
_____ आहे माझी, सौभाग्याची प्रीती.
भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्यांची आग आहे,
_____रावांचे नाव घेते______ घराण्याची शान आहे.
शब्द पडतील कमी, येवढी महाराजांची कीर्ती आहे,
______ रावांसोबत पतीच्या आधी, एक प्रेमळ मैत्री आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा, इतिहास वाचताना अंगावर काटा येतो,
_______ ला नेहमी सुखी ठेवण्याचे वचन, मी सर्वांसमोर देतो.
छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराष्ट्राच्या पाठीचा कणा,
_____ च नाव घेतो सर्वानी, जय महाराष्ट्र म्हणा.
छत्रपती शिवाजी महाराज आले कि, शत्रू जायचे पळून,
___________ चे नाव घेतो, जरा बघा मागे वळून.
शिवबांचे मावळे आम्ही, जन्म आमचा मराठ्यांच्या जातीचा,
_________ च नाव घेतो, अभिमान आम्हाला या मातीचा.
पराक्रम बघून, तोंडात बोट घालणारे अनेक असतात,
_______ आम्ही शिवरायांचे मावळे, मनात सर्वांच्या घर करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, अमर आहे जगात,
_________ रावांचे नाव घेते______ च्या घरात.
धन्य ती माउली, ज्या बनल्या शिवबांच्या गुरु,
_____ रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु.
जिथे शिवभक्त उभे राहतात, तिथे शांत बसतात सर्व,
______ रावांसारखे पती मिळाले, म्हणून आहे मला गर्व.
सह्याद्रीच्या छातडातून, नाद भवानी गाजे,
_______रावांचे नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे.
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये, आजही शिवाजी महाराजांच नाव घुमतंय,
_____ आणि ______ ला आशीर्वाद द्यायला, आज सर्व मित्र परिवार जमतंय.
छत्रपती शिवाजी राजे मिळाले, महाराष्ट्राच्या मातीला,
______ रावांसारखे प्रेमळ पती, मिळाले आयुष्यभर साथीला.
शिवाजी महाराजांची होती, सिंहाची चाल आणि गरुडाची नजर,
________ रावांचे नाव घेण्यास, नेहमी मी हजर.
रयतेचे राजे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज एकच,
__________ राव समाजासाठी, नेहमी कार्य करतात नेकच.
जरी कापल्या आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची,
__________ रावांची अशीच साथ असुदे, सात जन्माची.
मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली उडी,
___________ रावांच्या नावाने, गळ्यात बांधते मंगळसूत्राची जोडी.
छत्रपती शिवाजी महाराज, नेहमी गादीवर बसावे,
______ रावांचे नाव घेते, तुमचे आशीर्वाद सदैव असावे.
शिवरायांनी राज्य केले, शक्ती पेक्षा युक्तीने,
_______ रावांचे नाव घेते, प्रेमभाव भक्तीने.
शिवरायांच्या माथेवर, भवानी मातेचा हात,
________ रावांची अशीच असुदे, जन्मभर साथ.
मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात, सह्याद्रीच्या रांगा,
________ रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा.
रायगडाच्या सिहांसनावर, छत्रपती शिवाजी राजे,
________ रावांनी येताच, आयुष्य बदलेले माझे.
सह्याद्रीच्या गडावर पडते, छत्रपती शिवाजी महाराजांची सावली,
___________ रावांचे नाव घेते, धन्य ती माउली.
मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही,
_____ च नाव घेतो, आयुष्यात कधी तुझी साथ सोडणार नाही.
- Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
- Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
- Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे
- Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे
- Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे
- Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
- Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
- Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
- Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे
- Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
0 Comments
Thanks For Watching