Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे

img 

लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
_____ तुला आणला मोगऱ्याचा गजरा.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
_____ सारखा हिरा.
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,
_____ सोबत सुखी आहे सासरी.
फुलासंगे मातीस सुवास लागे,
_____ रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
दही,साखर, तूप,
_____ राव मला आवडतात खूप.
मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो _____ आणि माझी जोडी.

 

शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,
_____ चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.
धरला यांनी हात वाटली मला भीती,
हळूच म्हणाले _____ राव अशीच असते प्रीती.
एका वर्षात असतात महिने बारा,
_____ च्या नावात समावलाय आनंद सारा.
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,
पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.
सूर हवा तर ताल हवा ताल हवा तर सूर हवा
_____ रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा.
मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
_____च्या स्पर्शाने उमटले झंकार..!
पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,
_____रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
झाली प्रभात विहंग उडाले गात,
_____ रावांच्या जीवनाला माझी अखंड लाभो साथ..!