Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे

img 

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
_____ रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
_____ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
घातली मी वरमाला हसले _____ राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
_____ रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

 

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
_____ बरोबर संसार करीन सुखाचा.
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
_____ चं नाव घेते देवापुढे.
गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
_____ रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
_____ रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
_____ यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
_____ रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
_____रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
_____ नाव घेते बांधते_____ च्या लग्नाची गाठ.
वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
_____ च्या सवे चालते मी सप्तपदी!!
चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
_____ रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
_____चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
_____ रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
शेल्या शेल्याची बांधली गाठ,
_____नाव मला तोंडपाठ.
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
_____ च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
संसाराच्या रथाचे, प्रेम आणि विश्वास सारथी
_____रावांसोबत करते, मी _____ची आरती
_____ला नेसली, साडी नऊवारी
_____ व माझी जोडी, आहे सगळ्यांत भारी 
हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभते ठुशी
_____रावांचे नाव घेते, _____च्या दिवशी

 

फुलापानांची रांगोळी, काढली आज दारी
_____रावांसोबत करते मी, _____पूजेची तयारी
संसाराच्या करंजीत, प्रेमाचे सारण
_____रावांचे नाव घेते, _____दिवसाचे देऊन कारण
ताटांपुढे काढते, रांगोळी क्रमाक्रमाने
_____रावांचे नाव घेते, तुमच्या इच्छेप्रमाणे
निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी
_____रावांचे नाव घेते, _____च्या वेळी 
वसंतात दरवळतो, फुलांचा सुवास
_____सोबत सुरु केला, मी जीवनाचा प्रवास
माझ्या गुणी _____ला, पहा सगळ्यांनी निरखून
जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून