Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात_____ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात
माहेरच्या आठवणीने, डोळे झाले ओले_____रावांच्या प्रेमाने, अश्रूंची झाली फुले
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे_____मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे
माहेरची नाती, जणू रेशमाच्या गाठीरेशीमबंध सोडून सासरी आले, _____च्या साठी
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस_____तू फक्त, मस्त गोड हास
प्रेमरूपी दिव्यात लावते, प्रीतिची वात_____रावांचे नाव घ्यायला, केली आजपासून सुरुवात
नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना, मन माझे भांबावते_____च्या साथीने नव जीवनाचे, स्वप्न मी रंगवते
परातीत परात, चांदीची परात(माहेरचे आडनाव) ची लेक आणली, मी (सासरचे आडनाव) च्या घरात.
पायातल्या जोडव्यात, माहेरची स्मृती_____ रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती
गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे_____च्या येण्याने, भाग्य उजळले माझे
बहिणीसारख्या नणंदा, भावासारखे दीर_____रावांचे नाव घ्यायला, झाले मन अधीर
नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून_____रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून
नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा_____राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा
संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान_____रावांच नाव घेते सर्वांचा राखून मान
माहेर सोडताना, पावलं झाली कष्टी_____रावांच्या संसारात, करेन सुखाची वृष्टी
नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी_____माझा राजा आणि मी त्याची राणी
बरसला पाऊस, दरवळली माती_____रावांसोबत, फुलली नवीन नाती
लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा_____ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा
चांदीची जोडवी, लग्नाची खूण_____ रावांचे नाव घेते, _____ची सून
नवे घर, नवे लोक, नवी नवी नातीसंसार होईल मस्त, _____राव असता सोबती
आपला आशीर्वाद, आहे लाख मोलाचा_____रावांसोबत, संसार करेन सुखाचा
- Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
- Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
- Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे
- Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे
- Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे
- Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
- Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
- Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
- Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे
- Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
0 Comments
Thanks For Watching