Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे

img 

सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश
_____ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश
सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात
_____ रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड
____च नाव घेतो, आता तरी वाट सोड
माहेरी साठवले, मायेचे मोती
_____च नाव घेऊन, जोडते नवी नाती
आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary 
_____ रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry
शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात
_____रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात

 

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल
_____च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात
_____रावांचे नाव घेते, _____च्या दारात
रुपेरी सागरावर, चंदेरी लाट
_____ रावांचं नाव घेते, सोडा माझी वाट. 
_____ची लेक झाली, _____ ची सून
_____ च नाव घेते, गृहप्रवेश करून!
गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट
_____रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
मायेने वाढवले, संस्कारांनी घडवले
_____चं नाव घ्यायला, _____नी अडवले
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज
_____च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज