Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे

img 

पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी 
_____ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी 
सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट 
_____यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट
मंथरेमुळे घडले रामायण,
_____ चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण
ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी 
_____चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी 
चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती 
_____रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

आजच्या पूजेला फुलांच्या राशी, 
_____च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 
भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा 
_____च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा
दारावर लावले झेंडूचे तोरण 
_____चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण 
चांदीच्या ताटात ठेवले लाडू
_____चे नाव घेते सत्यनारायणापुढे 
घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी 
_____चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 
आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
_____ चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
_____नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.
सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.
_____माझा हीरो मी त्याची हिरॉईन
सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी
_____रावांचे नाव घेते, _____च्या दिवशी 
_____च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर
_____रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर 
मोत्यांची माळ, सोन्याचा साज
_____रावांचे नाव घेते, _____आहे आज 
_____ची आरास, सर्वांना पडली पसंत
_____रावांमुळे फुलला, जीवनी वसंत
_____पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी
_____रावांचे नाव घेते, _____च्या दिवशी